Sunday, December 12, 2010

नवाबी सुलतानपूर

हा लेख म्हणजे डोक्यातला सुलेमानी किडा आहे बाकी काही नाहि !

सर्व पात्रे काल्पनिक,संबंध असल्यास योगायोग!!!


नवाबी सुलतानपूर
गरमागरम चर्चासत्रानंतर निवांत चहा घेत आमच्या चकाट्या पिटणे चालू झाले
“जाम आडवा पडले रमेशराव तुम्ही त्याला “
“पण साल्या तू आमच्यातला असून मनुस्मृतीला विरोध काय करतोस ,ते लोक आपल्याला मनुवादी म्हणतात त्याची काहीच वाटत नाही का तुला ?”
“ए येड्या मी तुमच्यातला किंवा त्यांच्यातला कुनातलाच नाही .कळला का? आणि फक्त वाद-संवाद होता म्हणून काय मी मानुस्मृतीविरुध्ह बोललो नाही काही .सावरकरांना मानतोस न तू ?मग त्याचे वाक्य माहित नाही काय “धर्मग्रंथ जर ५००० वर्ष जुने असतील तर ते ५००० वर्ष मागासलेले आहेत ,त्यांच्यावर आज कशाला आपण भांडायचे .हा अन तुलाही त्या ग्रंथांचा अभिमान वाटावा असा काय आहे तुझ्यात हा ? एखाद दोन श्लोक किंवा उतारे का काय म्हणतात ते बोलून दाखव बरं? आणि मनुस्मृती नुसार तुला दुसर्या दिवशीचा धनसंचय करण्याची परवानगी नाही !चालेल का तुला ? फाटली का आता .उगाचच विरोधासाठी म्हणून विरोध बरोबर नाही “
तेवढ्यात राज्याचा फोन आला उस्मान च्या नवाबी सुलतानपूर गावाला जायचे ठरत होते सगळे जुने मित्र जमणार होते ५ वर्षांनी .मस्त धमाल करायची ठरली होती .आम्ही सगळे कला शाखेत एकत्र होतो .जम धमाल करायचो .पुढे मी पत्रकारितेला प्रवेश घेतला .राजेश कॅम्पानीत चिकटला उस्मान शेती पाहण्यासाठी परत गावाला गेला .सुधीर आणि गणेश हे एम ए करणार होते .
प्रेस मधून सुट्टी काढून .एक कॅमेरा आणि एका पिशवीत समान घेवून मी आणि राजेश निघालो सुध्या आणि गणेश ला जमणार नव्हते त्यांची सेट ची परीस्क्षा होती .राजेश म्हणाला “येडे काय मारुस्तर शिकणार बहुतेक ?”
“च्यामायला उस्मन्याचे गाव म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे म्हणे!”
“अरे तिथे आधीपासून निजामाचे राज्य मग तसेच असणार तिकडची संस्कृती!आपण नाही का पुण्यात पेशव्यान्सारखे राहतो !”
उस्मानाची फळांची शेती होती मराठवाड्यातला तो एकाच भाग जरा बागायती शेती करण्यासारखा होता, जवळ निजामाने बांधलेला एक किल्ला होता आता पडलेलाच असल्यामुळे दुर्लक्षित होता पण किल्ल्याचा परिसर मोठा होता तटबंदी मोडकळीस आलेली होती पण प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेली होती !
बसमधूनच किल्ला दिसत होता .
उस्मानघायला आला होता आमची रहायची सोय शेतातल्याच घरात केली होती .गावातून जात असताना मंदिरान्वरचे झेंडे उंच उंच बांधलेले होते का ते कळत नव्हते .जुन्या निजाम काळी मशिदीही दिसत होत्या .घुमट मोठे होते .एका मंदिरात ‘हरी कथेचे कीर्तन’ चालू असल्याच्या आवाज येत होता .

“उस्मान्या मी आता माळ घातली आहे तुझे ते नोंवेज हिकडं नको आणूस .रम्या तू पण नको खावूस भडव्या .मला तू एक संग तू बामनाचा असून खुशाल तंगड्या तोडतो रं!तुमच्यामुळे चिकन महाग झाले!”
मी केविलवाणे हसलो ,म्हणालो “राज्या जोक जुना झाला आता ,अन हा महाग झाले म्हणून चिकन सोडले तू .माळ घातल्याचे नाटक करतोस भोंदू .आमच्या नावावर खपवू नको “
“ए गप्पे धर्माला नाव नको ठेवुस .तू तर काय धर्मच सोडलाय पाया तर पडत नाहीस तू देवाच्या .”
“अरे पाया पडून पडून पाय झिजायला लागले देवाचे !म्हटला कशाला देवाला त्रास द्यायचा. आंनी तुमीच तर म्हणतात न देव सर्वत्र आहे .मग मी त्याचीच पूजा करतो मी !”
“बराबर है रमेश “उस्मान म्हणाला ,तसा राजेश चिडला
“ए तू गप्प बैठ बे .रोज पाच पाच वेळेस तर सिलेंडर वरती करतो तू ,हरामखोर “दोघांचे भांडण कुठे जाणार हे ओळखून मी विषय बदलला !
बाहेरच बाजावर आम्ही झोपलो होतो .देवळातला हरिपाठ ऐकू येत होता “krushna अर्जुनाला म्हणाला .”इथे ,तिथे सगळीकडे मीच भरून राहिलेलो आहे अर्जुन माझ्यात मी आणि तुझ्यातही मीच आहे ……………….सत्य धर्म कोणता ते ओळखून घे आणि त्याच प्रमाणे पालन कर ………जो अद्वैतवाद शंकराचार्यांनी मांडला तोच श्रीकृष्णाने पार्थाला सांगितला आहे ………….”डोळा कसा लागला ते कळलच नाही…..
सकाळी सर्व आवरून आम्ही किल्ला पाहायला निघालो .उस्मान ने मुख्य किल्ला दाखवला ,पडलेल्या किल्ल्याची हलत पाहवत नव्हती .महाराजांच्या किल्ल्यांचे किल्ले पाहुन उर भरून येतो तसेही इथे काहीच वाटत नव्हते .सगळे वातावरण भकास वाटत होते .पण किल्ल्याची तटबंदी पहिली आणि ती मस्त झाडणी वेढली गेली होती .उस्मान ला म्हटले चल फिरून येवूयात तटबंदी .उस्मान पहिले नको म्हणत होता पण नंतर तयार झाला …….

तटबंदी फिरताना छान वाटत होते .पण आता दुपार होत आली होती सोबत आणलेली पाण्याची बाटलीही संपली होती थोडा थांबलो .आणि आम्ही झाडाखाली बसलो होतो .उस्मान ने आणलेल्या भाजी भाकरी वर ताव मारला .आणि निवांत झाडाखालीच पहुडलो होतो. राजेश आणि उस्मान च्या पुण्याबद्दलच्या गप्पा चालू होत्या .मी सहज वाचावे म्हणून उस्मानने भाकर्या बांधून आणलेला पेपर वाचायला लागलो .आदल्या दिवशीचा पेपर होता .पहिलीच बातमी .”कोल्गी गावात मेलेली गाय रस्त्यावर सापडली गावात दंगल .मालमत्तेचे प्रचंड नुकसान !” च्यायला झाला का चालू उस्मानला विचारले कोल्गी गाव किती दूर आहे तर तो म्हणाला २०० किलोमीटर वर आहे दुसर्या जिल्ह्यात येते .त्याला त्या बातमी बद्दल सांगितले अचानक त्याचे हावभाव बदलले .तो समान उरकायला लागला म्हणाला”चला आता निघुयात .गावात अजून काही नाही तरी दंग्यांना सुरुवात होवू शकते !”
मी म्हणालो “पण गाव तर शांत दिसते आहे !”
“तरी चला शेतावर जाऊयात ,मग बोलूयात “
आंम्ही नाखुशीनेच निघालो .पण तहान भरपूर लागत होती .समोर काही अंतरावर एक वास्तू दिसत होती उस्मानला विचारल्यावर त्याने तो शाही हमाम आहे असे सांगितले शाही हमाम म्हणजे शाही अंघोळीची जागा!
ती जागा बर्रीच झाडांनी वेढलेली होती .तिथून एक जन येताना दिसला .राजेश ने पुढे जावून त्याला पाणी आहे का ते विचारले .तो उद्वौद्विची उत्तरे देत निघाला .पण उस्मानला पाहिल्यावर तो थांबला “क्या रे शकील किधर से आरा?”
“वो हमाम के बाजू मी खालिद भाई और लाडके लोग गये है जमात काम चालू है पाणी चैये तो आप जाईये पार अकेलेही जाओ “त्याचे वाक्य जरा खटकले .
मी उस्मानला म्हटले तूच जावून पाणी घेऊन ये मी थांबतो .पण राज्याला खूप तहान लागली होती तोही उस्मान सोबत निघाला .
थोड्यावेळ वाट पाहूनही ते येत का नाहीयेत म्हणून मी पाहायला गेलो तर बघितलेला प्रकार अतिशय भयानक होता ………………………………………..

उस्मानला माणसांनी धरून ठेवले होते आणि राज्या मार खात होता .पहिले जाम हादरलो नन्तर काय होतेय याची जाणीव झाली आणि मी राजेशच्या मदतीला धावून गेलो .त्याला वाचवत असताना डोक्यात विचार येवून गेले कि काय झाले असेल …….मी त्यांना सांभाळू शकत नव्हतो आता मी आणि राजेश दोघेही मार खात होतो ….मरणार्यांच्या सगळ्याच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला “दंगल चालू झाली आहे !”
माझा प्रतिकार करण्याचा जोर उतरला होता मला आणि उस्मानला फरफटत एकीकडे घेऊन गेले उस्मानानेही आधी बराच मार खाल्लेला दिसत होता .तो कदाचित राज्याला वाचवायचा प्रयत्न करत असेल .राजेश लाही कुठे तरी घेऊन गेले .आम्हाला एका खोलीत नेऊन बसवले .मी उस्मानला विचारले “हे सगळे काय आहे !”
“मी बोलाथा राज्या को अंदर मत जा जमात कि बाते चल राही है !लेकीन…………. लेकीन वो माना नही “उस्मान रडकुंडीला आला होता .
“अरे पण तो आतमध्ये गेल्याने असे काय झाले ?तो आतमध्ये म्हणजे कुठे गेला ?त्याला एवढे का मार्तायेत “
“अंदर दंगेकी बाते चल राही थी ४ मुस्ल्मानोके घर बाजुके गाव मे जलाये गये हि २ हिन्दुओ कि मौत हूवी है .बाजू के गाव मे कर्फ्यू लागा है शायद अपने भी गाव मे लगेगा !”
डोक्यात संताप भरला .न राहवून उस्मानावरच मी ओरडलो “तुम्ही धर्मांध साले हरामखोर आहात !”
बाजूला उभ्या असलेल्या माणसाने मला परत मारायला सुरुवात केली आणि माझी शुध्द हरपायालाला लागली……………………………………………………….
……………………………….

………..
डोळ्यावर सारखी झापड येत होती तरी मी डोळे उघडून बघायचा प्रयत्न करत होतो .हात बांधल्याचे जाणवत होते मागे मी खुर्चीला टेकून उभा आहे .राज्या कुठे आहे ते दिसत नव्हते पण उस्मान दिसत होता त्याला बांधलेले नव्हते .तो कुणाशीतरी बोलत होता ,जरासा भ्यालेला दिसत होता.चार माणसे समोर उभी होती एक खुर्चीवर बसून काहीतरी बडबडत होता एकाच्या तोंडावर रुमाल तर बाकीचे सगळे तसेच होते .बोलण्यात सारखे सारखे जमात-उम्मत असे शब्द येत होते !
हळू हळू हातापायाला वेदना जाणवायला लागल्या,गुडघ्याला बरेच लागलेले होते .बोटाच्याही पेरांमध्ये बरीच आग होत होती बहुतेक बोटांवर चाकूने वार केले असावे .
“साले उनके साथ कैसे रेहने लागा बे तू ?”
“खालिद भाई कोलेज के यार है सब ,इधर घुमते हुवे आये थे ,प्यास लागी थी,शकिल दिखा, बोला खालिद भाई है इधर तो पाणी पिने के लिये आ गये .हमे क्या पता था.इधर ये सब हो राहा है .राजू अच्छा है लेकीन तुमरी बातोसे भडक गया उसे माफ करदो. “
“हमारी बाता इन काफिरो ने सूनली ना , अब क्या करे .”
“लेकन भाई मैने तो सुना था के तुम जमात कि तालीम को जा रहे हो ?इधर येः सब क्या बोल रहे हो ?”
“मजहब को सही राह दिखाना याही अपने बच्चो के लिये तालीम है “
असे काहीतरी बोलणे चालू होते .मला वेदना सहन न झाल्याने माझे विव्हळणे चालू झाले .अचानक पायाला कळ आली आणि मी जोरात ओरडलो .सगळ्याचे लक्ष माझ्याकडे गेले . खुर्चीवरचा माणूस माझ्याकडे आला .आता तो मला स्पष्ट दिसत होता .पण नाकापासून खालचा भाग त्याने मोठ्या रुमालाने झाकला होता .
त्याने माझ्याशी सरळ मराठीतून बोलायला सुरुवात केली
.
“काय रे कावून हथापायी केली माझ्या छोक्र्यांशी , तुला काही ते करत होते का “
“राज्या माझा दोस्त आहे त्याला मारताना मला बघवले नाही म्हणून सुरुवात केली .”
“तो हरामखोर आमच्या मजहब विरुध्द बोलत होता “
“नाही तो तुमच्या धर्माविरुद्ध नाही आमच्या धर्माच्या बाजूने बोलत होता “
“तेच ते तुमचा धर्म हा आमच्या धर्माच्या विरूद्धच आहे ,आमच्या धर्मात जे कुफ्र तेच तुमच्या धर्मात पवित्र आहे ,दगडांचे देव बनवून त्याची पूजा करता , प्राण्यांची पूजा करता .३३ कोटी देवांना पूजतात .अल्लाह हा फक्त एक आहे “
“तो प्रत्येकाचा धार्मिक प्रश्न आहे “
“नाही खरा धर्म फक्त एक आहे “
“खरा धर्म माणुसकी आहे “
“ए गप्प बस खरा धर्म म्हणजे शांती मिळवणे म्हणजेच इस्लाम “
“पण ती शांती फक्त मुस्लीमांच्याच कामाची असेल तर ती खरी शांती कशी ?”
“इथे काही आपण खरा खोटा करायला नाही आलो .उगाचच कत्तली होवू द्यायच्या नसतील तर चुपचाप निघा .”
“कत्तली आम्हालाही होवू द्यायच्या नाहीत …….”
“फार बोलतोस रे तू .हा… जीभ उचकटून टाकेल तुझी .”
“स्वतःला तुम्ही कोण आलमगीर समजत कि काय जीभ उचाकाटायला …”
उस्मान मधेच पडत म्हणाला “ये गप्प रम्या…भाईजान अब हमे जानेदो हम नाही आयेंगे आयिंदा याहापे .मी तो इनको अपना बाडी दिखाने कि लिये आय था .ये लोग इन सब मी नाही है मेरे शहर के दोस्ता है .”
” ये काम क्या करता है ?”
“वो राजू है न वो फक्टारी मी है .और ये अखबार मी काम को है “
माझ्याकडे बघून तो माणूस म्हणाला “का रे पत्रकार आहेस का तू “
“हो “
“मग तर तुला कसा सोडू ?हा …”
“ये हरामखोर तो पुरा छापेगा अखबार मे!”
“नाही माझ्याकडे फक्त बुळबुळीत सांस्कृतिक बातम्या असतात .हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन ,हिंदुनी रोझा पळून दाखवले एकतेचे दर्शन .मुस्लिमांनी केली गणपतीची आरती .अशा बातम्या !”
“म्हणजे हे तुला पण माहितीये कि हिंदू मुस्लीम एकता हा फक्त भ्रम आहे !!”
“हो .कुठल्याही दोन धर्मांमध्ये एकता शक्य नाही .एकवेळ थोडीफार समरसता होवू शकेल !पण पूर्ण एकता कधीही शक्य नाही,तुम्ही कयामतच्या दिवसाची वाट पाहतात ,हिंदू धर्म्क्रांतीची ,इसाई येशूच्या परत येण्याची “
“आता कुठलाही प्रेषित परत येणार नाही !महोम्मद सल्लौसाल्लाम हे शेवटचे आणि एकमेव प्रेषित आहेत “
“असेल ,पण जगातली पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला धर्म तसे मानत नाहीत !आणि तुम्ही त्यांच्या धर्माला मानत नाहीत ,आणि अतिसहिष्णू हिंदू लोक जगातले सर्व धर्म एकच आहेत असे मानतात .मग तिघांपैकी कोणीतरी २ जन मूर्ख पाहिजेत “
“जबान नको लढवूस माझ्याशी ……”
शांतता पसरली .
माझ्या घशाला कोरड पडली होती,
“पाणी पाजणे इस्लाम मध्ये महत्वाचे धार्मिक काम सांगितले आहे .. मला पाणी मिळू शकेल का ?”
खालिद ने उस्मान ला सांगितले मला पाणी पाजायला .
उस्मान मला काळजीच्या स्वरात रागवत होता “तू कशाला बे तुझी पत्रकारिता गाजीव्तोस गप बस कि मुकाट्याने ..त्यांच्यासमोर झुकून राहा वरचढ होवू नकोस .”
तशा वातावरणातही मला हसू फुटले “साल्या उस्मान्या तू हि जातीवर गेल्यास भडव्या !”.
“गांडू गप्प बस कि मी परत जातो त्याच्याकडे “
“राज्या कुठे आहे ?”
“मलाही नाही माहिती .आपण चार तासापासून इथेच आहोत ,किल्ल्याच्या वरती आणून टाकले आहे आपल्याला .साला कुठून तुम्हाला इथे आणले आहे असे झाले मला , त्या राज्यालाही फार आपली लाल करायची होती .”
“त्याचे बरोबर होते .फक्त आडदांडपना नडला त्याला .आणि तुझी काहीच चूक नाही आमची तुला फोर्स केला किल्ला दाखव म्हणून .पण कारे किल्ला तर पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे न मग हे असले जमात मदरसे कसे किल्ल्यात ?”
“अरे हे सगळे किल्ले आणि मराठवाडा भारत स्वतंत्र झाला तरी निजामाच्या ताब्यात होता .त्यामुळे मदरसे आधीपासून आहेत .मी पण लहानपणी अलिफ,बे इथूनच शिकलो बापाची बदली पुण्याला झाली मग तिकडे आलो !”
“मदर्ष्यात पुढचे शिक्षण सगळे कुरणावर असते का?”
“हो कुरण-हदीस चे शिक्षण “
“पण सरकारने संगणक विभाग चालू करायचे आदेश दिले होते जेणेकरून वैज्ञानिक दृष्टीकोन मुलांमध्ये येवू शकेल?”
“सरकारचा हस्तक्षेप वाढेल म्हणून त्याचे अनुदान मदर्स्यांनी नाकारले !”
“बाहेरचा दंगा निवळला असेल का आता?”
“काय माहित ? पण हसन सांगत होता कर्फ्यू लागलाय “
आम्ही इथून जिवंत बाहेर पडू शकत नाहीत असे वाटत होते .राज्या तर जिवंतही असेल कि नही अशी शंका सारखी मानत येत होती साला .साला दह्रम-धर्म यांनीच घाण केली. आणि मी स्वतःला कोणत्याही धर्माचा मानत नव्हतो पण तरीही ते मला हिंदूच मानत होते आणि मी हिंदूच आहे म्हणून माझा जीव घेणार होते !
एकदा संघवाल्या माणसाशी भांडताना माझे डावे विचार ऐकून “तुम्ही स्वतःला कोणीही समजा पण ते तुम्हाला हिंदूच मानतील .आणि हिंदू म्हणूनच मारतील “असे बोलून निघून गेला .आत्ता ते विचार मानत डोकावत होते

खालिद परत आला कुणाशी तरी बडबडत होता “साले हरामखोर नेता लोग .दंगे दबादिये नहीं तो और कटते थे हिंदू !”
माझ्याकडे आला माझ्या गालात मारून “साल्यानो तुमची औरंगजेबाने हलत केली तशी करायला पाहिजे होती “
“तू आता तसे नही करू शकत कारण हे लोकशाही राज्या आहे आता धर्मावर चालणारे राज्य कधीच येवू शकत नाहि”
“असे कसे हे राज्या तर हिंदू राज्यच आहे “
‘हाहा तसे असते तर आम्हीही कृशासारख्या १७६० बायका केल्या असत्या !पण काय करू संविधान त्याची परवानगी हिंदुना देत नाहि “मरणाच्या दरातही मला असले विनोद सुचत होते “हा मात्र तुम्हाला चार लग्ने करण्याची परवानगी आहे मग राज्या आमच्या धर्माचे का तुमच्या धर्माचे !”
“आम्ही आमच्या धर्माचे हक्क भांडून घेतले आणि हो आम्हाला कुठल्याही कायद्याची गरज नाहि आम्ही फक्त शरियत चे कायदे मानतो “
मी आता काय व्हायचे ते होवो असे म्हणत पुढे सरसावलो “ते धर्माचे कायदे मानायचे ते सगळे घरी ,आम्ही काही आमचे जुने धर्मग्रंथातले कायदे वापरू शकत नाहीत !”
“तुमचे धर्मग्रंथ एकमेकात एकमेकात भेद करायला शिकवतात तर आमचा धर्मग्रंथ उम्मत (एकता )शिकवतो !”आता गाडी धर्म वरून धर्मग्रंथावर आली होती .
“बरोबर आहे जर धर्मग्रंथात काही चुकीचे सांगितले असेल तर ते धर्मग्रंथ माणू नयेत .पण असेच जर तुमच्या धर्माग्राबाबत झाले तर तुम्ही काय कराल ?”
खालिद गडबडलेला दिसत होता ,तरी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला “आमचा धर्मग्रंथ परिपूर्ण आहे “जिथे कुठलीही शंका उरत नाहि असा”असे आमच्या धर्मग्रंथाचे वर्णन आहे “
“अच्छा म्हणजे धर्मग्रंथात सांगितले म्हणून तुम्ही माझी बोटांची पेरे तोडण्याचा प्रयत्न केलात “
“हो”
मी हताशपणे हसलो आणि धन्यवाद दिले माझ्या धर्माला कि माझा धर्म स्वतःच धर्महीन हे आपल्याच धर्मासाठी किती चांगले आहे नाहीतर जातीजातींमध्ये भांडणं होवून एकेमेकांना मारून आपण कधीच मेलो असतो .
उस्मान आता खर्या कोणत्या धर्माचा हाही मला प्रश्न पडत होता ?कारण खर्या मुस्लिमाने आमच्याशी काफिरांशी मात्री ठेवली असती ? आमच्यामध्ये दोस्ती हाच धर्म होता .त्यात त्याचा धर्म आणि माझा धर्म कधीही आड येत नव्हता !
काही वेळानी बाहेर बर्याच माणसांचा आवाज यायला लागला खालिद आणि ती माणसे बाहेर निघून गेली काही वेळाने आतल्या माणसालाही बाहेर बोलवून घेतले .
थोड्यावेळ काहीच हालचाल नाहि हे पाहुन उस्मान बाहेर डोकावून आला कोणीच नव्हते .मला खांद्याशी घेवून त्याने मला बाहेर काढले .ती माणसे कुठेच दिसत नव्हती खाली हमामापाशी पोलीस आलेले दिसत होते .तिथे जाऊन पहिले तर राजेश ला पोलिसनाच्या गाडीत बसवत होते त्याला दवाखान्यात घेवून जाणार होते त्याला चाकूने भोकासलेले होते, शुध्द नव्हती .गाडी गेली.कदाचित पोलीस येणार म्हणून आम्हाला सोडून ते पळाले होते.
३ दिवसांनी मी घरी आलो गावातली कहाणी संपादकाला सांगितली तर त्याने मला त्यावर स्टोरी लिही असे सांगितले “हे बघ त्या माणसांचा दयाळू-पणाही छाप तुझ्या लेखात .आणि त्यांनी शेवटी तुम्हाला कसे सोडून दिले .तुला तुला त्यांच्यातली माणुसकी कशी भावली .हेही छापले तरी चालेल .पण तुझ्या मित्रावर केलेल्या अत्याचाराचे वर्णन नको लिहूस ” मी फक्त हसलो .
गणपतींच्या दिवसात मी कोल्हापूरला गेलो तिथे एका गणपती मंडळाच्या अध्याक्ष्याशी भेटलो अध्यक्ष मुस्लीम होता. त्याने चाथूर्तीचे उपवास कसे केले वगैरे वगैरे …असा लेख तयार केला .
दुसर्या दिवशी पेपर मध्ये लेख पहिला माझा पहिल्या पानावर बाजूला लेख होता “कोल्हापुरातली गणपतीची सर्वधर्मीय आरती “
दुसर्या पानावर औरंगाबादच्या दंगलीची बातमी होती ..
तिसर्या पानावर काश्मीर मध्ये १९ काश्मिरी पंडितांची दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची बातमी होती ………
हिजरत …करार …….जिहाद .
हे तीन शब्द मनात येवून गेले !!!!
.